‘या’ कारणामुळे ग्रामीण भागात पसरला कोरोना ; माजी पालकमंत्री राम शिंदे यांचा आरोप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या बाबतीत ठाकरे सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. त्यांच्या अयोग्य नियोजनामुळे शहरातील कोरोना ग्रामीण भागांत पसरला.

असा आरोप करत श्रीमंतांना शहरात महागडे उपचार घेतात येतात, ग्रामीण भागातील गरीब नागरिकांनी काय करायचं? असा सवाल माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

पुणे- मुंबईपर्यंतच मर्यादित असलेला कोरोना सर्वदूर पसरत चाललाय. नियोजनासाठी तीन महिने हातात असतानाही सरकारनं ठोस पावलं उचचली नाहीत.

त्यामुळं ग्रामीण भागांत व जिल्ह्यात व्हेंटिलेटर व सुविधांचा आभास जाणवतोय. पण, सरकारकडे ग्रामीण भागाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये.

हे तीन पक्षांचं हे सरकार भांडणातच मश्गूल आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांची सत्ता मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. सामान्य माणसाचा जीव वाचवण्याची ही स्पर्धा नाहीये असा आरोपही त्यांनी केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment