‘येथील’ प्रसिद्ध व्यापार्‍याच्या एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. शिर्डी शहर कोरोनमुक्ती कडे वाटचाल करत असतानाच त्या ठिकाणी पुन्हा कोरोनाने आपली मुळे रोवली आहेत.

शिर्डीतील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तब्ब्ल सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड होताच शहरात खळबळ उडाली.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या 14 वर जाऊन पोहचली आहे. एकाच कुटुंबातील बाधित रुग्ण असल्याने ते कोणाच्या संपर्कात आले होते याचा शोध घेण्याचे कार्य नगरपंचायतमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.

यासाठी नगरंपचायतचे पथक तसेच महसूल प्रशासन काल सकाळपासून संबंधित सात बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहे. मात्र पुरेशी माहिती मिळत नसल्याची खंत यावेळी पथकातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment