महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची गाडी पुन्हा धावू लागली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.

संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. संगमनेर तालुक्यात आज गुरुवारी ३९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ७१२ इतकी झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ८५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७१ टक्के इतके झाले आहे.

कोरोना बाधितांची आकडेवारी मध्ये पूर्वीप्रमाणे वाढ होत नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment