अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : सध्या कोरोनारुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आता कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सदर महिला डॉक्टर कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून काम करणारे लोणी येथील रहिवासी असलेल्या
एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगाव येथील तेरा जणांना खासगी ठिकाणी कॉरन्टाईन करण्यात आले होते.
४ जून रोजी महिला डॉक्टरचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासले असता या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews