कोरोनाचा वेग घटेना; नागरिकांची चिंता मिटेना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे.

अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते आहे.

अकोले तालुक्यात रविवारी २८ व्यक्ती करोनाबाधित आढळून आलेत. यामध्ये नवलेवाडी ०८ ,धुमाळवाडी ०५, अकोले ०५, रुंभोडी ०२, सह तालुक्यात २८ व्यक्ती कोरोना बाधीत आढळले.

दरम्यान कोरोनाची वाढती संख्येमुळे तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २ हजार ५८५ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात तालुक्यात घेण्यात आलेल्या ६६ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १८, व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेतील १० अशी एकुण २८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment