‘ह्या’ तालुक्याची कोरोनमुक्ती क्षणभंगुर; पुन्हा दोन रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला.

परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. आता तालुक्यात दोन रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक 34 वर्षीय महिला करोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

तालुका प्रशासनाने तातडीने करंजी गावात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. तत्पूर्वी तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची नाशिक

येथील खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाची तपासणी केली असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. तालुक्यात सक्रिय असलेले दोन कोरोना रुग्ण बाधित झाले आहे.

ही महिला कोपरगाव आधी वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात रविवारी उपचार घेत होती. त्यानंतर शस्रक्रिया करणासाठी कोपरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती झाली होती.

मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी या महिलेची शस्रक्रिया करण्यापूर्वी करोना चाचणी करण्याचा आग्रह धरल्याने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी प्रयोग शाळेत पाठवला होता. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपार्गातील लोकांचा शोध प्रशासन घेत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment