मनपाची ‘ती’ मोहीम चुकीची आमदार संग्राम जगताप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- नगर शहरात महानगरपालिकेने प्लास्टीक पिशव्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची सुरू केलेली मोहीम चुकीची असून ही मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी आ. संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली  शहरातील व्यापाऱ्यांनी नुकतीच मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कैफीयत मांडली.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाने निर्बंध घातल्यानंतर विशिष्ट जाडीच्या ( मायक्रॉन ) प्लास्टीक पिशव्यांच्या वापरास सशर्त परवानगी आहे.

मात्र याबाबतचे शासन निर्णय व्यापाऱ्यांना व कारवाई करणाऱ्या पथकाला माहीत नाही. तसेच सदर प्लास्टीकचे परिमाण / जाडी मोजण्याची यंत्रणा उपलब्ध नाही.

असे असतांना प्लास्टीक पिशव्या  व्यापाऱ्यांवर सरसकट होत असलेली दंडात्मक कारवाई चुकीची असल्याचे आ. जगताप यांनी सांगीतले.

शहरातील छोटया मोठया व्यावसायिकांवर कारवाई करण्यापेक्षा अशा प्रकारचे नियमबाह्य प्लास्टीक उत्पादकांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी या वेळी आ. जगताप यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe