‘ह्या’ नगरपालिकेत कचर्‍यात लाखोंचा भ्रष्टाचार; केलेय ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- शहरांमध्ये कचऱ्याची समस्या मोठी आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अणि कचरा निर्मूलनासाठी नगरपालिका विविध उपाय योजत असते.

परंतु श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या कचऱ्यामध्येच लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या नगरपालिकेत मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 साठी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचे ओला,

सुका वर्गीकरणानुसार संकलन करून वाहतूक करणे या कामाकरिता ईबी एनव्हायरो बायोटेक प्रा. ली., नाशिक यांची नेमणूक केलेली आहे.

या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. वेगवेगळ्या कामावर होणारा खर्च अधिक दाखवून बिले काढली जात आहेत अशी तक्रार संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

 काय केले आहेत आरोप ?

– घनकचर्‍याचे वजन करणे करारानुसार बंधनकारक असताना ठेकेदार फक्त 1 किंवा 2 दिवसांचेच वजन करून बाकीच्या दिवसाचे सरासरी वजन बेकायदा पद्धतीने स्वतःच्या मनाप्रमाणे व ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे गृहीत धरून नगरपरिषदेने बिले अदा केली.

– कचरा संकलन करताना कचरा ओला व सुका गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना घंटा गाडीमध्ये सर्व कचरा हा वेगळा न करता एकत्र भरला जातो.

– मार्च महिन्यापासून पूर्ण लॉकडाऊनमध्ये व्यापारी बाजारपेठा 100 टक्के बंद होत्या. तरीसुद्धा बंदच्या काळातले कचर्‍याचे वजन हे बाजारपेठ चालू असताना पेक्षा जास्त दाखविले आहे.

– लॉकडाउनच्या कालावधीत श्रीगोंदा शहरातील रस्त्यावरील कचरा व बांधकाम राडारोडा संकलीत करून वाहून नेण्याकामी लाखो रुपयांची बिले नगरपालिकेने अदा केली.

– संपूर्ण शहरात प्रत्येक महिन्याला घनकचरा ठेकेदाराने स्वतःफोगिंग व जंतूनाशक, तणनाशक यांची फवारणी केलेली नसूनसुद्धा केले असे दर्शवून खोटी बिले वसूल केलेली आहेत वस्तुतः पावसाळ्यात फोगिंग करावे, अशी मागणी नागरिकांनी करून मशीन नादुरुस्त आहे, फवारणी केली नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment