कार्यक्रमात जाऊन दगडफेक करून धिंगाणा घातल्याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-दुसऱ्याच्या हळदीच्या कार्यक्रमात जाऊन दगडफेक करून धिंगाणा घातल्याप्रकरणी ११ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

नऊ जणांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली, तर दोन जण फरार असल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कोपरगाव शहरातील टाकळी नाक्याजवळ राहणाऱ्या योगीता संजय थोरात यांच्या दिराच्या हळदी कार्यक्रम चालू असताना आरोपी दीपक राजेंद्र नाईकवाडे,

अमोल नरेंद्र पेकले, दशरथ मच्छिन्द्र त्रिभुवन, शरद मच्छिंद्र त्रिभुवन, विशाल पिंगळे, विकी सरोदे, अजय दिलीप डावखर, आकाश रोहकले, सचिन साळवे, साईनाथ मच्छिंद्र त्रिभुवन, गणेश बाबुराव काटे (सर्व कोपरगाव) यांनी फिर्यादीच्या दिराच्या हळदीचा कार्यक्रमात दगडफेक व विटांनी मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News