अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी लागू आहे. त्याच प्रमाणे महत्वाची देवस्थानेही बंद आहेत. शिर्डीचे साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी अजून खुले केलेले नाही.
असे असताना ठाणे येथून विना परवाना शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी आल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत संचारबंदीचं उल्लघन केल्याप्रकरणी भादवि कलम 188 (2) 269,271 त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अधि.
2005 चे कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल केला. ठाणे जिल्ह्यातील मंगेश दीपक मोरे, रमेश संदिप रेड्डी, सागर श्रीनिवास गड्डम आणि गुरुनाथ देवसिंग पवार हे चौघे चारचाकी वाहनातून शिर्डीला आले.
पहाटे 3:30 वाजता साईमंदिर परिसराच्या प्रवेशव्दार क्रमांक एक समोर यांनी आपले वाहन (एमएच 05 बीजे 6887) पार्क केले.
तसेच यातील काही मंडळी बाहेर फिरताना पोलिसांना दिसून आली. यातील एकानं देखील मास्क लावलेला नव्हता त्यामुळे रात्री गस्त घालणार्या पोलीसांनी त्यांच्याकडे विचारपुस केली असता
ते विनापरवाना जिल्ह्यात दाखल झाल्याचे निष्पण झाले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews