दूध आंदोलनप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

त्यामुळे विविध मागण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील निंबाळे बाह्यवळण समनापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी दूध प्रश्नी आंदोलन केले.

याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार बाळासाहेब मधुकर यादव

यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, संतोष मधुकर रोहोम, दीपक वसंतराव भगत, श्रीराज भाऊसाहेब डेरे, राजेश माधवराव चौधरी, योगराज सिंग कुंदन सिंग परदेशी,

राहुल संपत दिघे, सोपान कोंडाजी तांबडे, संपत रामनाथ अरगडे, परिमल धनंजय देशपांडे, संजय चंद्रकांत नाकील, कैलास राजाराम कासार, नवनाथ बाबुराव दिघे,

संपत नाना राक्षे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1190/2020 भारतीय दंड संहिता 269, 188, महा.को 19 वि 2020 चे कलम 11, महा. पो. अधि. क 37,1/3 चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन उपद्रव करून हयगयीने व मानवी जीवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य व संसर्ग पसरवण्याची हयगयीची व घातक कृती करून शासनाच्या विविध आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe