अहमदनगर – नगर तालुक्यात लहान मुलीशी गैरवर्तन केल्याच्या रागातून वृद्ध दलित व्यक्तीला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील गुणवडी येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत जनावरांची छावणी व त्याच्या घरातून बाहेर ओढून या वृद्धास मारहाण झाली.

याप्रकरणी बाळू गणपत शेळके, संतोष बाबासाहेब शेळके, अमोल रमेश परभणे, संजय माणिक शेळके, संतोष माणिक शेळके, सागर राजू शेळके, रावसाहेब गणपत शेळके, गणपत शेळके,
माणिक शेळके, राजू दगडू शेळके, योगेश बबन शेळके, बबलू बाल्मीक शेळके, रमेश गणपत शेळके, महेंद्र प्रकाश शेळके, गोरख सुभाष पवार
व इतर ७० ते ८० अज्ञात व्यक्ती ( सर्व रा. गुणवडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध बेकायदा जमवून दलित व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी ‘ॲट्रॅसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Samsung ला टक्कर देणार Apple चा पहिला Foldable iPhone! 2026 मध्ये बाजारात धुमाकूळ
- बुरुडगाव कचरा डेपोमधील प्रकल्पात शॉर्टसर्किटमुळे लागली आग
- प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श ग्रामपंचायत विकसित होणार
- जन्मजात श्रीमंत असलेल्यांची नवी पिढी देतेय उच्चस्तरीय गुंतवणुकीला प्राधान्य !
- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत, रोहित पवार यांच्या विरुद्ध हक्कभंग !