अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जुन्नर तालुका हद्दीवर असणान्या पारनेर तालुक्यातील काताळवेढा गावात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन रविवारी (दि.१३) बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.
त्यामुळे आयोजकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील १२ तर जुन्नर तालुक्यातील वाळवणे येथील दोघांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या सबंधीची फिर्याद पोलीस नाईक शामसुंदर विश्वनाथ गुजर यांनी दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून सुभाष रामदास गाजरे, बाबाजी रामदास गाजरे, युवराज रामदास गाजरे, विलास पांडुरंग भाईक, संभाजी सुखदेव भाईक, सोमनाथ पांडुरंग भाईक, धर्मनाथ रघुनाथ भाईक, बाळू बबन गुंड,खंडू कचरू भाईक, विजू दादाभाऊ गाजरे,
प्रकाश किसन घटाटे (सर्व रा. काताळवेढा, ता. पारनेर), ज्ञानदेव जनाजी साबळे, विशाल धनाजी साबळे (दोघे रा. नळवणे, ता. जुन्नर), सुरेश भीमा काकडे (रा. पळसपूर, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्याच्या काताळवेढा गावच्या शिवारात गावापासून एक किलोमीटर अंतरावर माळरानाच्या चढावर १३ डिसेंबर रोजी सकाळी वाजण्याच्या दरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
काताळवेढा येथे पारनेर व जुन्नर तालुक्यातील १४ आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून बैलगाडा शर्यत लावून जनावरांना क्रूरतेने वागणूक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक फौजदार शिवाजी कडुस करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com