फरार बाळ प्रकरणी ’तारीख पे तारीख’ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील सूत्रधार बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही बाजुची सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.

उद्या बुधवारी कोर्ट त्यावर आदेश करणार असल्याचे समजते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ’तारीख पे तारीख’ सुरू आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार,पत्रकार बाळ बोठे याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज सकाळच्या सत्रात पुन्हा लांबणीवर पडले आहे.

बोठेचे वकील महेश तवले व सरकारी वकील सतीश पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान यावर दुपारच्या सत्रात न्यायालय काय निर्णय देणार याविषयी उत्सुकता आहे.

रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणात बाळ बोठे याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आल्यानंतर तेंव्हापासून तो फरारच आहे. त्याच्या मागावर पोलिस पथके आहेत.

आज जामीन अर्जावर तिसर्‍यांदा सुनावणी झाली मात्र, सकाळच्या सत्रात न्यायालयाने काही निर्णय दिलेला नाही. दरम्यान आज दोन्ही पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

बोठे याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्याची मागणी सरकारी पक्षाचे वकील पाटील यांनी न्यायालयात केली. कोर्ट उद्या बुधवारी (दि.16) त्यावर आदेश करणार असल्याचे समजते आहे. बोठे गुन्हगारी वृत्तीचा बोठेचे वकील तवले यांनी बोठे याच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.

मात्र जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनी बोठे याच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा संदर्भ देत कागदपत्र न्यायालयासमोर सादर केले आहेत.