महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात वाळूतस्करांकडून दिवसाढवळ्या वाळू उपसा

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर: तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माती मिश्रित वाळू परवानाच्या नावाखाली साकुर येथील वाळू तस्करांनी पारनेर तालुक्‍यातील देसवडे येथील वाडेकर वस्तीजवळ असणाऱ्या पात्रात जेसीबी पोकलेनच्या साह्याने रात्रंदिवस वाळू उपसा सुरू केला आहे.त्यामुळे या अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी देसवडेचे सरपंच बाबासाहेब भोर व ग्रामस्थांनी केली आहे.

दुसरीकडे यामुळे नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा लिलाव अथवा परवानगी नसतानाही जेसीबी, पोकलेन सहाय्याने दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाडेकर वस्ती येथील ग्रामस्थांनी केली आहे. संगमनेर तालुक्‍यातील हद्दीतील वाळू तस्करांनी साकुर येथील चौगुले नावाच्या शेतकऱ्याच्या खासगी क्षेत्रात 600 ब्रास मातीमिश्रित वाळू याची परवानगी संगमनेर महसूल प्रशासनाने दिली आहे.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी वाळू वाहतूक केली जात आहे, परंतु या वाळू तस्करांनी पारनेर तालुक्‍यातील हद्दीतील असणाऱ्या मुळा नदीपात्रात आपला मोर्चा वळविला असून देसवडे येथील वाडेकरवस्ती जवळील असणाऱ्या नदीपात्रातून जेसीबी पोकलेन साह्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात आहे.

यासंबंधिचे पुरावे संगमनेर येथील महसूल विभागाला देऊनही कोणत्या प्रकारची कारवाई न केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे या मातीमिश्रित परवान्याच्या नावाखाली येथील मुळा नदीपात्रातून हजारो वाळू उपसा केला जात आहे.मुळा नदीपात्रात पारनेर, संगमनेर, राहुरी अशा तीन तालुक्‍यांच्या हद्द असून या हद्दीचा फायदा घेत वाळू तस्कर वाळू उपसा करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment