अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. सर्व देशातच हे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगली आहे. बाहेरून येणार्या रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
त्यानुसार नगरमध्ये देखील प्रशासनाने तयारी केली आहे. कोरोनाचा वाढत धोका पाहता परराज्यातून येणार्यांची अॅँटीजेन चाचणी येथील रेल्वेस्टेशनवर करण्यात येत आहे.
यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. हे कर्मचारी रेल्वेने बाहेरच्या राज्यातून येणार्या रुग्णांची चाचणी करत आहेत.
नगरमध्ये ते कुठे जाणार, गाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती त्यांच्याकडून संकलित केली जात आहे. अॅँटीेजेन चाचणीत रुग्णाला लक्षणे आढळल्यास लगेच संबंधितांना कळविण्यात येत आहे.
महापालिकेने यासाठी तेथे काही कर्मचारी नियुक्त केले असले तरी प्रत्यक्षात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत विचारणा केली असता एकाचवेळी वसुली आणि रेल्वेस्टेशनवर नियुक्ती असे दोन्ही कामे सांगितले जात आहेत. त्यामुळे काही कर्मचारी रेल्वेस्टेशनवर तर काही वसुलीसाठी जातात, असे सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved