शिर्डीत 60 बेडच्या कोरोना रुग्णालयाचे लोकार्पण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. राहाता, शिर्डी तालुक्यातही कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. वाढती रुग्णांची संख्या वैद्यकीय व्यवस्थेवर तणाव वाढवत चालला आहे.

यासाठी आणखी बेड उपलब्ध व्हावेत यासाठी राहाता तालुक्याकरीता सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमसह सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या 60 बेडच्या कोव्हीड हॉस्पिटलची सुरूवात शिर्डीत होत आहे.

कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या आणि गंभीर रुग्णांची ऑक्सिजन बेड अभावी होणारी धावपळ लक्षात घेवून आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहाकार्याने या कोव्हीड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.

शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. तालुक्यातील आरोग्य विभागाने या रूग्णालयाच्या उभारणीसाठी गतीने निर्णय प्रक्रिया राबविल्याने अतिशय कमी कालावधीत साई आश्रम फेज 2 येथे कोव्हीड हॉस्पिटलची उभारणी झाली आहे.

सेन्ट्रल ऑक्सिजन सिस्टीम हे या सेंटरचे वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त 30 ऑक्सिजन बेड आणि 10 बेड अतिदक्षता विभागात कार्यान्वित करण्यात आले आहेत. राहाता तालुक्यातील शिर्डी येथे 114 बेडचे कोविड केअर सेंटर, 114 बेडचे डि.सी.एच.सी व 100 बेडचे कोविड हॉस्पीटल लोणी येथे उपलब्ध आहे.

रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता सदरची व्यवस्था अपूर्ण ठरत असुन आणखी बेडची आवश्यकता असल्याने माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करुन देत श्री.साईबाबा संस्थानच्या सहकार्याने 60 बेडच्या कोविड केअर सेंटरची अल्पावधित उभारणी करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment