मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली म्हणून माझ्या मुलीची बदनामी; पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांचा आरोप

पूजा खेडकर यांचे वडील  दिलीप खेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली व यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक असा आरोप केलेला आहे.

Ajay Patil
Published:
pooja khedkar

Ahmednagar News: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गाजलेले पूजा खेडकर प्रकरण हे सगळ्या महाराष्ट्राने जवळून पाहिले व त्यांच्या बाबतीत अनेक नको त्या गोष्टी या प्रकरणात बाहेर आल्या व शेवटी त्यांना बडतर्फ करण्यात आले. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते व यामध्ये यूपीएससीने म्हटले होते की, पूजा खेडकर यांनी त्यांचा स्वतःचं नाव बदललेले होते तसेच ओबीसी प्रमाणपत्र देखील खोटे होते.

असे अनेक प्रकारच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आले व शेवटी त्यांना बडतर्फ करण्यात आले. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आता पूजा खेडकर यांचे वडील  दिलीप खेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली व यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक असा आरोप केलेला आहे.

प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की माझ्यावर एफआयआर दाखल असल्यामुळे दबाव होता व त्यामुळे मी इतके दिवस समोर आलो नाही. तसेच आपल्या मुलीवर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत ते सगळे खोटे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

 दिलीप खेडकर यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केला असून त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली ती वस्तुस्थितीला धरून नव्हती.ती एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती सगळीकडे गेली होती व ही माहिती चुकीची आहे. या सगळ्या प्रकारामुळे तिचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे व माझ्या विरोधात देखील एफआयआर दाखल करण्यात आल्यामुळे माझ्यावर दबाव असल्या कारणाने मला समोर येता आले नाही असे देखील त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे म्हटले की,माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती व त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली. प्रस्थापितांना वाटत होतं की मी निवडणुकीला उभे राहू नये व या कारणामुळे मला नेत्यांच्या माध्यमातून जाणून बुजून त्रास दिला गेला.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनामध्ये याबद्दल राग होता व त्यांच्याकडे महसूल खाते असल्यामुळे या गोष्टीचा प्रभाव शासकीय अधिकाऱ्यांवर पडला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पण यामध्ये नैसर्गिक न्याय मिळणे गरजेचे होते.

परंतु तो मिळाला नाही असे आरोप दिलीप खेडकर यांनी केले आहे.तसेच यूपीएससीच्या माध्यमातून देखील आरोप करण्यात आले व त्यात यूपीएससीने म्हटले आहे की,पूजा खेडकर यांनी स्वतःचे नाव बदलले. पण तिने नाव बदलले नाही. यूपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली संबंधित कारवाई केली. तसेच ती वंजारी आहे व तिचे ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही असे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe