अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- धनादेश न वटल्यामुळे जामिनदार आरोपीस सहा महिने कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरीतील एका सहकारी पतसंस्थेमध्ये घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी दगडुराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. राहुरी यांच्याकडून बाबुराव पंढरीनाथ गाडे, रा. बारागांव नांदुर यांनी दि. 25 जून 2004 रोजी दुग्ध व्यवसायासाठी 70 हजार रुपये कर्ज घेतले होते.
त्यांच्या कर्जास त्यांचे भाऊ अनिल पंढरीनाथ गाडे हे जामिनदार होते. बाबुराव पंढरीनाथ गाडे यांच्याकडे फिर्यादी पतसंस्थेची दि.31 मार्च 2016 पर्यंत 2 लाख 37 हजार 363 रुपये रक्कम येणे होती.
त्या थकबाकीपोटी जामिनदार या नात्याने अनिल पंढरीनाथ गाडे यांनी फिर्यादी पतसंस्थेस दि.02 एप्रिल 2016 रोजीचा चेक दिला.
संस्थेने चेक बँकेत भरला असता अनिल गाडे यांच्या खात्यात पुरेशी रक्क्म शिल्लक नसल्याने फिर्यादी संस्थेने आरोपीस अॅड. शिवाजी कल्हापुरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस देऊन रकमेची मागणी केली. प
रंतु अनिल गाडे यांनी नोटीस मिळूनही मुदतीत रक्कम दिली नाही. म्हणून आरोपी अनिल गाडे यांच्याविरुध्द राहुरी न्यायालयात फिर्यादी पतसंस्थेचे अॅड. एस. आर. कल्हापुरे यांनी खटला दाखल केला. दरम्यान न्यायालयाने अनिल गाडे यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा देण्यात आली.
तसेच एका महिन्याच्या आत 03 लाख फिर्यादी पतसंस्थेस नुकसानी दाखल देणेकामी न्यायालयात भरण्याचा आदेश केला आहे. तीन लाख न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|