अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-गाव असो वा शहर अतिक्रमण या समस्यांचा सगळीकडे फैलाव झालेला आहे. दरम्यान आता हि समस्या अत्यंत जटिल होऊ लागली आहे.
मात्र या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नुकतेच शहरातील अतिक्रमण या समस्येबाबत वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशहरातील वाढती अतिक्रमणे तात्काळ हटवावी अन्यथा आम्ही हटवू असा इशाराच पक्षाच्या वतीने मनपाला देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील तेलीखुंट ते भिंगारवाला चौक, मोची गल्ली,
सराफ बाजार, तांबटकर गल्ली येथील अतिक्रमण खुप वाढले आहे. यामध्ये मोठे दुकानदार हे रस्त्यात गाड्या लावतात, त्यांचेच छोटी छोटी दुकाने रस्त्यावर लावून पूर्ण रस्त अडवतात.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पायी देखील चालणे मुश्किल झालं आहे. सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी पाहता कापड बाजार मध्ये खुप मोठ्या प्रमाणात नियम बाह्य कारभार चालला आहे.
हे अतिक्रमण त्वरित हटवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेईल, असा इशारा मनपाला देण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved