आनंददायक ! जुलैच्या पूर्वार्धातच निळवंडे ५० टक्के भरले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   सध्या मान्सूनने पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.

उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण काल रात्री ५० टक्के भरले. पाऊस सुरू असल्याने धरणात काल दिवसभरात 28 दलघफू पाणी आले.

8 हजार 300 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6 वाजता 4 हजार 147 दलघफू पाणीसाठा झाला होता. भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे.

गत 36 तासांत धरणात 330 दलघफू पाणी आल्याने सायंकाळी धरणातील पाणीसाठा 3657 दलघफू झाला होता.

मागील 24 तासांतील पाऊस (मिमी)
घाटघर 48
रतनवाडी 52
पांजरे 44
वाकी 28

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment