अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- काही दिवसापुर्वी वाळकी (ता. नगर) येथे ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक होण्यासाठी मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन म्हणाले की नगर तालुका पोलीस स्टेशन हे नीट तपास न करता आरोपीला पाठीशी घालत असून ह्या घटनेचा संपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात यावे.
व आरोपी हा मोबाईल व्हाट्सअपवर त्याचे स्वतःचे स्टेटस ठेवत आहे तरीदेखील पोलिसांना मुख्य आरोपी मिळत नाही त्यामुळे हा तपास एलसीबी वर्ग करण्याची मागणी मुलाच्या आईने केली आहे.
वाळकी (ता. नगर) येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय 21) याला काही दिवसांपूर्वी विश्वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली.
यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी आरोपी असलेला विश्वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापि आरोपी फरार असून, नगर तालुका पोलीसांनी त्याला अटक केलेली नाही.
त्यामुळे ह्या घटनेचा संपूर्ण तपास एलसीबी स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved