अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांकडून जास्तीचे बील वसुल करुन शासनाची व रुग्णांची फसवणुक करणार्या रुग्णालयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन
जास्त बीलाची रक्कम कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना परत मिळण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना देण्यात आले.
यावेळी आरपीआय युवकचे शहराध्यक्ष अमित काळे, नाना पाटोळे, सनी खरारे, संदीप आहेर, तालेवर गोहेर, नरेंद्र तांबोली, साहिल कुडीया आदी आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी संबंधीत रुग्णालयांना नोटीस पाठविण्यात आले असून, त्यांना म्हणने मांडण्याची वेळ संपत आली आहे.
पुढील नोटीस बजावून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. अहमदनगर शहरांमध्ये नामांकित रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारापोटी रुग्णांच्या नातेवाईकाकडून जास्तीचे पैसे घेतल्याप्रकरणी शासकीय तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणात लाखो रुपये रुग्णांना परत देण्याची वेळ खाजगी हॉस्पिटल प्रशासनावर ओढवली आहे. संबंधित रुग्णालयास जास्तीचे पैसे रुग्णांना परत करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र कोणालाही सदर पैसे मिळालेले नाहीत. कोरोना महामारीच्या संकटात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार बुडाला
तर काहींना नोकर्या गमवाव्या लागल्या. सर्वसामान्यांनी कोरोनाच्या उपचारासाठी घर विकून, दागिने गहाण ठेऊन तर सावकाराकडून कर्ज घेऊन पैसे उपलब्ध केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी शासकीय दर ठरवून दिले होते.
तरी देखील शासनाच्या नियमांना न जुमानता कायदे पायदळी तुडवून मनमानीपणे जास्तीचे बिल रुग्णांकडून वसुल करण्यात आले आहे. रुग्णालयांनी एकप्रकारे शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे. प्रशासनाने संबंधीत रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी फक्त नोटीसवर
न थांबता सदर साथरोग प्रतिबंध कायदा उल्लंघन व फसवणुक प्रकरणी साईदीप हॉस्पिटल, सुरभी हॉस्पिटल, अॅपेक्स हॉस्पिटल, प्रणव हॉस्पिटल आदींसह तपासात जास्तीचे बील आकारणार्या इतर रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,
तीन वर्षासाठी सदर रुग्णालयांचे परवाने रद्द करावे तसेच जास्तीचे बील त्वरीत रुग्णांना परत मिळवून देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved