अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या जवळ ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर खाली एका चिमुरडीचा चिरडून मृत्यू झाला.
सदर घटनेत आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेच्या वतीने बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये पो.नि. अरविंद माने यांना देण्यात आले.
कुकडी सहकारी साखर कारखान्यात ऊस नेत असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली काजल अशोक पाडळे (वय- 12 वर्षे) ही मुलगी दुर्दैवी मयत झाली. ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने जात असल्याने चिमुरडी ट्रॅक्टरच्या खाली आली.
सदर घटना शुक्रवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी घडली. मुलीचे वडील अशोक पाडळे हे एका पायाने अपंग आहे व आई-वडील दोघेही मजूर काम करतात. त्यांना खर्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज आहे. ज्या ट्रॅक्टरने अपघात घडला त्या ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नाही व कसल्याही प्रकारचा विमा नाही.
दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉली क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊसाने भरलेल्या होत्या. या चुकीच्या गोष्टीमुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ट्रॅक्टरला एकच ट्रॉली लावल्यास चालकाला योग्य अंदाज येऊन अपघात घडणार नसल्याचा मुद्दा दादासाहेब पाडळे यांनी मांडला.
सदर कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी गावचे सरपंच सचिन पाडळे, ऊस तोडणी कामगार वाहतूकदार मुकादम संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाडळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये