पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळ उपलब्ध करुन देण्याची मागणी रिकामे हांडे घेऊन महिलांचा पाण्यासाठी आक्रोश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- भिंगार येथील इंदिरानगर भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी कॅन्टोमेंट कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

पाणी देता का? पाणी! च्या घोषणा देत महिला रिकामे हांडे घेऊन, तर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. आरपीआयचे शहराध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात

महादेव भिंगारदिवे, विशाल साबळे, अनिकेत मोहिते, अमोल शिंदे, संदीप ससाणे, शंकर करंडे, सुनील वाघमारे, गणेश लोखंडे, रोहित गवळी, वैभव उमाप, रोहित साळवे, शुभम काकडे, वैभव साठे,

संगीता साबळे, सुनिता उमाप, संगीता कांबळे, लीला आवरे, शकुंतला भारस्कर, सुमन गाडे, सुशीला वैरागर, सुमन अल्हाट, स्मिता साळवे, शोभा मोहिते, नंदा रॉय, गीता वाघमारे, मोना वैराळ आदि नागरिकांनी सहभाग नोंदवला. इंदिरानगर येथे मोठी लोकवस्ती असून, अनेक नागरिक वास्तव्यास आहे. या भागात सार्वजनिक नळ नाही. तेथे आधीचा असलेला जुना नळ बर्‍याच वर्षांपासून बंद आहे.

तेथील महिला व लहान मुले पाण्यासाठी लांब पायपीट करतात. पिण्याचे पाणी नसल्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच मिळेल तेथून पाणी आनत असल्याने दुषित पाण्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

येथील महिला दिवसा मोल मजुरी करुन रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी मोठे हांडे, ड्रम घेऊन लांबवरून पाणी घेऊन येतात. पाणी घेऊन येत असताना लहान-मोठे अपघातही घडत आहे. तसेच काही वेळा दारुड्या इसमांकडून महिलांची छेड काढली जाते. रोजच पाण्यासाठी जायचं असत या कारणाने महीला तक्रार करत नाही.

तसेच चार दिवसांपूर्वी बेलेश्‍वर जवळ एक इसमाने फाशी घेतली आहे. तेथेच महीला पाण्यासाठी जातात अशा ठिकाणी एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाल्यास याला जबाबदार कोण असणार? असल्याचा प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केला. इंदिरानगर ही मागासवर्गीय लोकांची झोपडपट्टी असल्याने एक वर्षापासून निवेदन देऊन सुध्दा जाणीवपुर्वक त्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सार्वजनिक नळ दिले जात नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

सदर मागणीसाठी दहा महिन्यांपूर्वी निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच सातत्याने स्थानिक नागरिकांचा या प्रश्‍नासाठी पाठपुरावा सुरु आहे.

तरी देखील या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. मुलभूत सोयी-सुविधा नागरिकांना पुरविणे हे कॅन्टोमेंट कार्यालयाचे प्रथम कर्तव्य असून, तातडीने इंदिरानगर भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर प्रश्‍न येत्या पंधरा दिवसात न सुटल्यास कॅन्टोमेंट कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment