अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- शिवसेना जिल्हा उपप्रमुख व इतरांवर तोफखाना पोलिस स्टेशन येथे दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शहर शिवसेनेने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, दत्ता कावरे, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, प्रशांत गायकवाड, जेम्स आल्हाट, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. 1
5 मे रोजी विजय रमेश सामलेटी यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीष जाधव व इतरांवर गु. र. न. 585/2021 भादवी कलम 385, 387, 379, 504, 506 सह 34 प्रमाणे दाखल केला आहे
या फिर्यादीमध्ये गिरीश जाधव व इतरांनी श्रीपाद छिंदम यास 12 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान 60,000 हजार रुपये हप्ता मागितल्याचा व दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक पाहता श्रीपाद छिंदम व त्यांचे सहकारी गुंड प्रवृत्तीचे आहेत, हे सर्वश्रृत आहे.
नगरमधील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांना छिंदम बंधूंनी सुपारी घेऊन मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना दोन-तीन वेळा हद्दपार केले होते. तसेच छिंदम बंधुंनी भागीरथ बोडखे यांचे ज्यूस सेंटर पाडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तेव्हापासून छिंदम यांच्या मनात गिरीष जाधव व इतरांविरुद्ध राग आहे. या राग व द्वेषापोटी छिंदम यांच्या सांगण्यावरुन विजय रमेश सामलेटी याने जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी. तसेच श्रीपाद छिंदम व विजय रमेश सामलेटी यांच्या विरुद्ध एमपीआयडी कायद्याअन्वये कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम