अहमदनगर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्याची मागणी ! एक आठवड्यापासून मागील भांडणाच्या कारणातून काही व्यक्तींनी…

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News :- केडगाव येथून एक आठवड्यापासून बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीची आई रानुबाई अरुण शिंदे व राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिजित खरात, प्रसिध्दी प्रमुख हरिश पंडागळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला धाव घेऊन मुलीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

तर मागील भांडणाच्या कारणातून काही व्यक्तींनी मुलीचा घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.रानुबाई अरुण शिंदे या केडगाव येथे राहत आहे.

त्यांची 24 वर्षीय मुलगी 12 ऑक्टोंबर रोजी राहत्या घरातून गेली व परत आली नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलीस स्टेशनला मुलीचा शोध घेण्यासाठी गेले असता घडलेल्या घटनेबाबत फक्त विचारणा केली, परंतु त्यावर आजतागायत कार्यवाही केलेली नाही.

मुलगी बेपत्ता होऊन एक आठवडा होत असल्याने कार्यवाही होत नसल्याने त्यांनी पुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार अर्ज दिला आहे. तर गेल्या सहा महिन्यापूर्वी शेजारील वस्तीवरील असलेल्या बच्छा व ढेऱ्या व त्यांच्या साथीदारांनी आंम्हाला बेदम मारहाण केली होती.

त्यांच्यासोबत काही महिलाही होत्या. या घटनेचा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी बेपत्ता होण्यासाठी मागील वेळी भांडण करणाऱ्या युवकांचा सहभाग असू शकतो, असे अर्जात म्हंटले आहे.

तर पोलीसांनी तातडीने दखल घेऊन मुलीचा शोध न घेतल्यास राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिजित खरात यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe