अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुनिल शिंदे, विनोद गायकवाड, संदीप गायकवाड, सुरज बोरुडे, दिपक साळवे, जीवन कांबळे, रवी भिंगारदिवे, बापू विधाते, अजिंक्य भिंगारदिवे, प्रदिप केदारे, प्रफुल्ल भिंगारदिवे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. सुनिल शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे देशात प्रगल्भ लोकशाही असतित्वात आली आहे.
बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्ये रुजवली. मात्र हुकुमशाही पध्दतीने वागणार्या भाजप सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. भाजप सरकार घटनेविरोधात कारभार करीत असून, हे देशाला अत्यंत घातक आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने समाजासह देशाची प्रगती होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विनोद गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे. 8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सक्रीय सहभाग घेऊन ते यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved