अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-राजकीय वाद, पक्षीय राजकारण, कटुता यामुळे अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झालेले आपण पाहिले असतील.
मात्र विकासातमक कामे करणारे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होणाऱ्या विकासकामांच्या उदघाटनाच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे.
हा संतापजनक प्रकार कोपरगाव शहरातील आंबेडकर चौकात घडला आहे. दरम्यान आंबेडकर चौकातील मैदानावर काँक्रीटीकरण कामाच्या भुमीपूजनाचा फलक लावून चोवीस तास होत नाही तोच अज्ञात समाज कंटकाकडून लावलेला बोर्ड फाडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अज्ञात समजा कंटकांनी केलेल्या हा लज्जास्पद प्रकार घडल्यानांतर राष्ट्रवादीचेचे कार्यकर्ते घटनस्थळी आले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पालिकेच्या अधिकाऱ्यांना फिर्याद दाखल करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान बोर्ड फाडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मागणी केली. यावेळी सुनील गंगुले म्हणाले की, पोलिसांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून अज्ञात समाजकंटकांचा छडा लावून कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved