आज कोरोना लस वितरणाचे नगरमध्ये प्रात्यक्षिक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- कोरोना लसीची प्रतीक्षा संपली असून, दोन कोरोना लसी आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत कोरोना लस दिली जाणार आहे.

नगर जिल्ह्यात लसीच्या वितरणाचे शुक्रवारी प्रात्यक्षिक होणार अाहे. नगरमध्ये तीन ठिकाणी लसीच्या वितरणाचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रात्यक्षिकातच लस देण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी, त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड दाखवावे लागेल. कोरोना लस येणार अशी चर्चा एक महिन्यापासून होती.

आता या चर्चेला विराम मिळाला असून, औषध महानियंत्रकांनी ३ जानेवारीला कोविशील्ड व कोव्हसिन या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. १४ जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. लस वितरणापूर्वी त्याचे प्रात्यक्षिक होणार आहे. शुक्रवारी नगरमध्ये तीन ठिकाणी कोरोना लस वितरणाचे प्रात्यक्षिक केले जाईल.

जिल्हा शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (वाळकी) व नगर शहरातील महापालिकेचे तोफखाना येथील आरोग्य केंद्र येथे हे प्रात्यक्षिक होणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी या दोन या वेळेत हे प्रात्यक्षिक केले जाणार असून, या तिन्ही ठिकाणी प्रात्यक्षिकात लस वितरण, लस देण्याची पद्धत दाखवली जाणार आहे.

तिन्ही ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २५ जणांना लस वितरण केले जाणार आहे. एकूण ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकात लस दिली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

तीस मिनिटे देखरेखीखाली ठेवणार आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या तीन लस वितरणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, प्रात्यक्षिकात लस दिल्यानंतर तीस मिनिटे लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment