उपसरपंच उद्धव काळापहाड यांचा राजीनामा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील उपसरपंच उद्धव अशोक काळापहाड यांनी सरपंच बापू गोरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. इतर सदस्यांना संधी मिळावी, यासाठी राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमारे अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बंधारे, नदी खोलीकरण, घरोघरी शौचालय, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे,

गॅसचे वाटप, कोरोना काळात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप, वैयक्तिक खर्चातून प्राथमिक शाळेला मदत, तसेच गोरगरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप आदी कामे केली.

येथून पुढच्या काळातही गावासाठी भरीव योगदान देऊ, ग्रामपंचायतला सहकार्य करू, असे काळापहाड यांनी सांगितले. सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

सरपंच बापूसाहेब गोरे, ग्रामसेविका कंठाळे, सदस्य विद्या गिते, संतोष डफळ, चरणदास आव्हाड, लता पालवे, संगीता आव्हाड यावेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News