नगर तालुक्यातील या जंगलास वणवा! शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील इमामपुर येथील जंगलाला वनवा लागला असून शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. वणव्यात विविध झाडांचे तसेच पशुपक्ष्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील गुंजाळे हद्दीतील डोंगरात वनवा लागल्यानंतर त्याची झळ इमामपूर हद्दीतील डोंगराला ही लागली. राहुरी तालुक्यातील व नगर तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्र त्यामध्ये जळून खाक झाले आहे.

इमामपूर येथील सर्वे नंबर ८४३ तसेच सर्वे नंबर ८५० मधील कवड्या डोंगरावर वनवा पेटल्याने मोठ्या प्रमाणात जंगलातील विविध जातीच्या वनस्पती जळून खाक झाल्या आहेत.

वनविभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वनकर्मचारी तसेच इमामपूर येथील ग्रामस्थांनी वनवा विझवण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे बांध जाळण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून डोंगराला वणवा लागण्याची शक्यता असते असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News