शहरातील विकासकामांना वेग येणार; मनपाने वसूल केले 22 कोटी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे सामान्य माणसाची आर्थिक कंबरडे मोडल्याने मनपात कर भरण्याचे प्रमाणही कमी झाले होते. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत थकबाकीवरील शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सुट जाहीर केली.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही आता पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत मनपाने २२ कोटींची वसुली केली आहे. त्यापैकी ७ कोटी १२ दिवसांत वसूल झाले.

दररोज ७० ते ८० लाखांची गंगाजळी मनपाच्या तिजोरीत जमा होत आहे. दिवाळीनंतर व्यवसायानिमित्त व्यस्त करदात्यांकडून कर भरण्याचा ओघ वाढेल असा विश्वास मनपा आहे.

उपायुक्त संतोष लांडगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना थकबाकीदारांच्या याद्या दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाकडूनही कर वसुलीसाठी पुन्हा गती देण्यात येणार आहे.

शहरातील मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी मनपाकडून वर्षभर प्रयत्न केले जातात, परंतु अपेक्षीत वुसुली होत नसल्याने त्याचा विकास कामांवरही परिणाम होत आहे.

शास्ती माफीची सवलत देऊनही काही बडे थकबाकीदार कर भरण्यास पुढे येत नसल्याने मनपा प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

त्यानुसार बुधवारपासून (१८ नोव्हेंबर) अशा थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच कराचा भरणा न केल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment