Ahmednagar News : सन २०२३ २४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे लेखाशीर्ष (२५१५, १२३८) या योजनेंतर्गत पारनेर तालुक्याला दोन कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यात ५ कोटी रुपयांची विकासकामे करण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय दादा विखे पाटील निधी मंजूर केला असून, यामध्ये पारनेर तालुक्याला २ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.
टाकळी ढोकेश्वर जि. प. गटात ५५ लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल राहुल शिंदे यांनी ना. विखे व खा. विखे यांचे आभार मानले आहेत. या कामांच्या माध्यमातून लोकांचा मूलभूत गरजा पूर्ण होण्यास मदत होईल, अशी माहिती बांधकाम कृषी समितीचे मा. सभापती काशिनाथ दाते सर त्यांनी दिली.
खा. विखे यांना माझ्या गावातील कामांबाबत माहिती दिली होती, त्यास त्यांनी तत्काळ मंजुरी देऊन ७० लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असल्याचे पं. स. सभापती गणेश शेळके यांनी सांगितले.