अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती परिसरात कल्पेश सुपर शॉपी किराणा दुकानात असताना
सुशीला मिश्रीलाल लोढा या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातून तोडून घेऊन पळवून गेले आहे .

सुशिलाबाई लोढा यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे फरार झाले. घटनास्थळी तातडीने पोलिस निरीक्षक खान यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे चोरट्यांचा शोध घेत आहे.
सुशिलाबाई लोढा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com