शनिवारी नगर तालुक्यातील ‘या’ गावात उडणार ‘धुरळा’..! होणार लाखोंची उलाढाल?

Published on -

Ahmednagar News : मागे काही वर्षांपूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी घातली होती त्यामुळे अनेकांचा हिरमुड झाला होता. काहीनी खास बैलगाडा शर्यतीसाठी जातिवंत बैल मोठी किंमत देऊन खरेदी केले होते, मात्र न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्याने आता या बैलाचे काय करायचे असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

दरम्यान याबाबत अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या होत्या. अखेरीस न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. त्यामुळे राज्यात अनेक भागात सध्या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगात आहे.

त्या अनुशंगाने नगर तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असून शनिवारी (दि. २० जुलै) भोरवाडी येथे नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यत होणार आहे. या शर्यतीमध्ये विजेत्यांवर मोटारसायकल, फ्रीज, एलईडी टीव्ही, कुलर या वस्तूंसह रोख अशा लाखो रुपयांच्या बक्षीसांचा धुरळा उडणार आहे.

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र नगर तालुक्यात इतिहासात गतवर्षी प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन भोरवाडी येथील हनुमान सप्ताह यात्रा उत्सवानिमित्त राहुल जाधव युवा मंच च्या वतीने करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेला हा चित्तथरारक शर्यतींचा थरार तब्बल १० तास रंगला या मध्ये १९० गाडामालकांनी सहभाग घेतल्याने या शर्यती साठी सुमारे ८०० बैल आणि २०० घोडे आणण्यात आले होते.

दिवस भरात जिल्ह्यातील हजारो प्रेक्षकांनी या शर्यती पाहण्यासाठी भोरवाडी येथे हजेरी लावली होती. आता या वर्षी पुन्हा शनिवारी (दि. २०) नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यत होणार आहे. या बैलगाडा शर्यतीचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या गाडा मालकांना मोटारसायकल, फ्रीज’ एलईडी टीव्ही कुलर व रोख रक्कम अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या शिवाय घाटाचा राजा तसेच फळीफोड साठीही रोख बक्षिसे दिली

जाणार आहेत. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करीत या शर्यती पार पडल्या जात आहेत. राज्यात ठिकठिकाणी शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे.

शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किंमती या लाखोंच्या घरात गेल्या आहेत. अशातच नगर तालुक्यात भोरवाडी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या या बैलगाडा शर्यती बाबत मोठी उत्सुकता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe