दिलासा : या तालुक्यातील नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- महसूल, कृषीविभाग व ग्रामसेवक असे संयुक्त पथक प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तिन दिवसात करुन अहवाल सादर करावेत, असे आदेश तहसीलदार शाम वाडकर यांनी मंगळवारी दिले आहेत.

तहसील कार्यालयात मंगळवारी तलाठी, कृषीसहाय्यक व ग्रामसेवक यांची बैठक तहसीलदार शाम वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी, तुर व इतर पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी व पंचायत समितीचे या तिनही विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे पंचनामे करतील.

त्याचा अहवाल तिन दिवसात तालुका महसुल प्रशासनाला सादर करतील. त्यानंतर तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला जाणार आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे खुप नुकसान झाले असून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, जिल्हा परीषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मदत देण्याची मागणी केलेली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन महसुल प्रशासनाला दिलेल्या सुचनांचे पालन करीत पंचनामे करण्यासाठी सर्वांना सुचना दिलेल्या आहेत. यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका कृषीअधिकारी प्रविण भोर,गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे उपस्थीत होते.

यावेळी बोलताना तहसीलदार शाम वाडकर म्हणाले, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. अहवाल मिळताच तो वरीष्ठांना पाठविला जाईल. तालुक्यात तिन दिवसात महसुल,कृषी व पंचायत समितीचे कर्मचारी पंचनामे करणार आहेत. हे पंचनामे तातडीने व्हावेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe