दिप चव्हाण यांची राजगुरू नगरपरिषद निवडणुकीच्या निरीक्षक पदी निवड म्हणजे निष्ठेचा सन्मान – मयूर पाटोळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते दिप चव्हाण यांची राजगुरू नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने निरीक्षक म्हणून जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टाकली आहे,

त्याबद्दल अहमदनगर शहर युवक कांग्रेस च्या वतीने दीप चव्हाण यांचा अहमदनगर महानगरपालिका येथे सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले,

दिप चव्हाण यांची निष्ठा व अभ्यासू रुती ही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कायमच आकर्षित करते, त्यांच्या निवडीचा आम्हाला देखील आनंद आहे व नामदार बाळासाहेब थोरात साहेब ,

सत्यजित दादा तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांनी चव्हाण यांच्या निवडीने निष्ठेचा सन्मान केला आहे, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना देखील समाधान मिळाले आहे,

असे मत युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी व्यक्त केले यावेळी सेवादल काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश भोसले, सुमित बनसोडे, आशिष गुंदेजा, प्रसाद सामलेटी, सुजय गांधी आदी उपस्थित होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment