संचालक भिमराव फरकांडे अपात्र: पदाचा गैरवापर करत बनावट कागदपत्रे बनवून बोगस कर्ज अंगलट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील मढेवडगाव विविध कार्यकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक भिमराव कोंडीबा फरकांडे यांनी पदाचा गैरवापर करत कार्यक्षेत्राबाहेरील वर्ग- ३ जमिनीवर बनावट सातबारे उतारे, शिरसगाव ग्रामपंचायतचे बनावट कागदपत्रे व खोटे शिक्के बनवून,

इकरार नोंद न करणे,अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, खोट्या मासिक सभा दाखवून ठराव करणे याबाबत सभासद अंबादास सोनबा मांडे व साहेबराव मुकींदा उंडे यांच्या लेखी तक्रारीवरून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी केलेल्या चौकशीत फरकांडे दोषी आढळल्याने त्यांच्यावर पदाचा गैरवापर करत सेवा संस्था व जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांनी संचालक भिमराव फरकांडे यांना संचालक पदावरून दि.२५ रोजी अपात्र ठरविण्याचा आदेश दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मढेवडगाव सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष भिमराव कोंडीबा फरकांडे व त्यांचे भाऊ तुकाराम कोंडीबा फरकांडे, भास्कर कोंडीबा फरकांडे, बापूराव कोंडीबा फरकांडे यांना संस्थेने घरकुल कर्ज मंजूर केले होते. या कर्जासाठी त्यांनी सेवा संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील शिरसगाव बोडखा येथील गट नं ३८ व ५९ मधील इनाम वर्ग-३ जमिनीचे क्षेत्र तारण म्हणून दिले.

या घरकुल योजनेत शिरसगाव बोडखा ग्रामपंचायतचे बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून खोटे ठराव, खोट्या मासिक सभा,घराच्या नोंदीचा खोटा उतारा, दाखले बनवून सेवा संस्था व जिल्हा बँकेला खोटे कागदपत्रे सादर करून कर्जाचे हप्ते घेतले. याबाबत तक्रारदार अंबादास सोनबा मांडे, साहेबराव मूकींदा उंडे यांनी लेखी तक्रार दाखल केली होती.

याबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या सखोल चौकशीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर यांच्याकडून अपात्र क्षेत्र असूनही बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून घरकूल व मध्य मुदत कर्ज मंजूर करून घेतले व संपूर्ण कर्जाची परतफेड न करता इकरार न उतरवता काही क्षेत्राचे परस्पर इतर व्यक्तींच्या नावे हस्तांतरण केल्याने

महा. सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ(१) चे उल्लंघन झाल्याने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रावसाहेब खेडकर यांनी फरकांडे यांना संचालक पदाचा गैरवापर करून संस्था व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पदावरुन अपात्र करत पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

चौकट: या फसवणुकीविरोधात सभासद तक्रारदार अंबादास सोनबा मांडे, साहेबराव मूकींदा उंडे यांच्यावतीने ऍड. समित बोरुडे यांनी कामकाज पाहिले. मढेवडगाव सेवा संस्थेच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल आहेत. बोगस कर्ज, बनावट कर्मचारी, जाणूनबुजून विरोधी सभासदांना कर्ज नाकारणे, खोटे इकरार करून संचालकांच्या हिताचे निर्णय घेणे व इतर. या गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वी संस्थेच्या सचिवाचे निलंबन झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment