वाद दोन कुटुंबांचा ; गावातील १८० व्यावसायिकांवर ‘ही’ कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-दोन कुटुंबाच्या वादातून त्याचे नुकसान गावातील सर्वच व्यावसायिकांना भोगावे लागण्याचा प्रकार टाकळीभान येथे घडला आहे. गावपुढारी मात्र मूग गिळून गप्प असल्याने व्यवसायिकांत असंतोष आहे.

या वादातून १८० व्यवसायिकांवर कारवाईची टांगती तालावर आहे. याची सविस्तर हकीकत अशी: टाकळीभान येथे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग 1 मधील आतिक्रमण करून राहत असलेल्या

दोन कुटुंबांत घराचे बांधकाम सुरू करताना रस्त्याच्या जागेवरून वाद झाले. या वादातील एका कुटुंबाचे टाकळीभान घोगरगाव रस्त्यावर बसस्थानक परीसरात व संत सावता महाराज मंदिर परीसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत

अतिक्रमण करून व्यापारी गाळे बांधलेले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन दुसर्‍या कुटुंबातील एका पाहुण्याने टाकळीभान घोगरगाव रस्त्यावरील

अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला निवेदन देऊन अतिक्रमण न काढल्यास 15 ऑगस्टपासून कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला.

संबंधित विभागाने 15 दिवसांत अतिक्रमणे हटवावीत अशी सुमारे 180 व्यवसायिकांना नोटीस दिली. त्यामुळे व्यवसायिकांचे धंदे मोडणार असल्याने खळबळ निर्माण झाली.

स्थानिक गावपुढारी मात्र या होणार्‍या कारवाईत मूग गिळून बसलेले आहेत. या दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांची समजुत घालण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे ? असा सवाल व्यापारी वर्गाकडून केला जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment