पैशाच्या देवाण-घेवणीवरून झाला वाद..माजी सैनिकाने नगरसेवकासोबत केले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोपरगाव येथे हॉटेलची उधारी मागितल्याने एका माजी सैनिकाने हॉटेल मालकाला दमदाटी करून पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माजी नगरसेवक विजय नारायण वडांगळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार माजी सैनिक राजेश रामकृष्ण जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार विजय वडांगळे २ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत बसलेले होते. राजेश जोशी यांनी त्यांच्या केबिनमध्ये येऊन पिस्तूल काढून लोड केले.

वडांगळे यांच्या दिशेने रोखून तुझे उधारीचे पैसे दिलेले आहेत, तरी तू परत परत पैसे का मागतोस, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. कोपरगाव शहर पोलिसांनी जोशी याला अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment