अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे हे 34 वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने दरवर्षी ख्रिसमसला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी द.स. पारगे, उबेद शेख,
बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेविका शैला कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय लोखंडे सर, नगरसेविका पारगे, कादिर शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, शहानवाझ शेख, हुसेन शेख, विजय साठे, राजू गायकवाड, हाजी फिरोज खान, नदिम मोमीन, श्रीकांत पवार आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुख, शांती, समृध्दीसाठी व कोरोनाच्या संकट दूर होण्यासाठी प्रभू येशु चरणी प्रार्थना करण्यात आली. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. दीन-दुबळ्यांना मदत केल्याने जीवनात सुख-समृध्दी नांदत असते.
गरजूंना आधार देण्यासाठी माजी नगरसेवक रुपसिंग कदम विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. ख्रिसमस निमित्त सलग 34 वर्ष ब्लॅकेट वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या थंडीची तीव्रता लक्षात घेवून जवान मित्र मंडळाने घेतलेल्या उपक्रमातून गरजूंना ऊब मिळणार आहे.
प्रभु येशु ख्रिस्तांनी दीनदुबळ्यांवर प्रेम करण्याचा दिलेला संदेश या उपक्रमाने आचरणात आला आहे. ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यांच्या सेवेने द्विगुणीत झाला असल्याचे संजय लोखंडे सर यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved