अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील धान्य वितरणचा बोजवारा उडाला आहे.
जुलै 2021 पासून धान्य वितरणाचा उत्तर नगर जिल्ह्यात बोजवारा उडालेला असून तालुका गोडावूनला वेळेत धान्य पोहचले नाही त्यामुळे गरिबांना धान्य मिळालेले नसून त्यांना या धान्यापासून वंचित ठेवले गेले आहे.
केंद्रशासनाची गरिबांकरिता असलेली अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे धान्य पॉस मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेऊन दिले जाते.
सध्या करोनाचे पार्श्वभूमीमुळे महिन्यात विकत 2 रु. व 3 रुपये किलोने प्रति मानसी 5 किलो व तितकेच मोफत धान्य वाटप केले जाते.
मात्र नेवासा तालुक्यातील गोडाऊनला धान्यपुरवठा डीओ नगर ऐवजी श्रीरामपूर येथील खासगी असलेल्या एफसीआयच्या गोडाऊनमधून केला जात आहे.
मात्र नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 20 हजार टन धान्य तालुक्यात कमी मिळाले. त्यामुळे जानेवारी उजाडला तरी चार वेळाचे धान्य वाटप राहिले असून विलंब झाला आहे.
शासनाचे धोरण वेळेत धान्य पुरवठा झाला पहिले असे आदेश आहेत. परंतु श्रीरामपूर येथील गोडावूनचा गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे.
याऐवजी नगर येथील गोडाऊनमधून धान्य दिल्यास, तेथे हमाल संख्या जास्त असल्यामुळे सुरळीत पुरवठा होईल व जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा कार्यालयाचे लक्ष राहील. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम