अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्ताने व कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर नगर येथील क्रिस्टल हॉस्पिटलच्या वतीने जगदंबादेवी देवस्थानचे ( मोहटादेवी) सर्व कर्मचारी व भाविक भक्त यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
सालाबादाप्रमाणे मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे यामध्ये मंदिरे बंद असल्याने मंदिराचे अधिकारी व कर्मचारी
तसेच भाविक भक्तांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यासाठी जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट,मोहटेचे विश्वस्त तथा नगर येथील क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांनी पुढाकार घेऊन वाटप करण्यात आले यावेळी श्री.जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे
यांचे हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक करीत जनसामान्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश्वर दराडे व आभार प्रदर्शन श्री.गणेश फसले यांनी केले.
याप्रसंगी दादा तळेकर जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त सर्वश्री अशोक दहिफळे,आजीनाथ आव्हाड,भीमराव पालवे,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.मढीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved