महिलांसाठी आयोजित कार्यक्रमातून सॅनिटायझर व मास्कचे वाटप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून महिलांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरोनाचा धोका व वाढते संक्रमण पाहता कार्यक्रमातून सॅनिटायझर आणि मास्क वाटप करणे या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते.

दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील नीळकंठेश्वर येथे हळदी-कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षा नंदा शिंदे यांनी मकरसंक्रातीनिमित्त तीळगूळ घ्या गोड बोला कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जि. प. सदस्या कोमल वाखारे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पं. स. सदस्या कल्याणी लोखंडे, बेबीताई मगर, चित्रा वेताळ, सीता ढवळे, प्रतीक्षा चव्हाण,

नंदा शिंदे, सविता शिंदे, द्रौपदा राऊत, सुप्रिया गणवीर, पुष्पा ढवळे, अनुराधा हराळ आदी उपस्थित होते. सुवर्णा कुल्लाळ यांनी आभार मानले.

यावेळी कोरोनाचा धोका लक्षात घेत महिलांना इतर वाण देण्यापेक्षा सध्याच्या काळानुसार सॅनिटायझर आणि मास्क देणे गरजेचे वाटत असल्याने यंदाच्या आयोजित कार्यक्रमात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment