अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिर्डी नगरपंचायत आणि डॉ.सुजय विखे पाटील मित्र मंडळाच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.
नगरपंचायतीमध्ये पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांच्या प्रमिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, गणेश कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप, विलास कोते, मधुकर कोते, शिर्डी सोसायटीचे चेअरमन प्रमोद गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर,
अॅड.अनिल शेजवळ, अभय शेळके, राजेंद्र गोंदकर, सचिन कोते, मनसेचे दत्त कोते, सुधिर शिंदे, दिपक वारुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ.सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांच्यासह मान्यवरांनी खासदार विखे पाटील यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालिंच्या आठवणींना उजाळा देवून नगरपंचायतीच्या वतीने श्रध्दांजली अर्पन केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved