जिल्हा बँक निवडणूक: १९५ अर्ज ठरले वैध तर ४५ अर्ज झाले बाद 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या निगराणीत सुरु आहे.

बुधवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संपन्न झाली. छाननी प्रक्रियेत १९५ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ४५ अर्ज बाद झाले आहेत.

वैध नामनिर्देशन पत्रांची सूची निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी गुरुवारी प्रसिध्द केली आहे. दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून त्यानंतर दि. १२ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर चिन्ह वाटप करीत अंतिम उमेदवारी यादी प्रसिध्द करणार आहेत.

सन १९५८ मध्ये जिल्हा सहकारी बँकेची स्थापना झाली. मागील सहा दशकांच्या वाटचालीत शेतकरी हिताचे अनेक पथदर्शी निर्णय बँकेने घेतले.ज्याची अंमलबजावणी राज्यस्तरावर झाली.

पक्षीय गटबाजी बाजूला ठेवित जुन्या- जाणत्यांनी बँकेच्या कारभाराची दिशा निश्चित केली. त्यामुळे जिल्हा बँकेचा प्रगतीचा आलेख चढता राहिला. मागील चार महिन्यापासून बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकिचे पडघम वाजत होते.

आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसह बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या नियंत्रणात प्रत्यक्षात सुरु झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment