१४ रुग्णांचा बळी घेणारे जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड : दोन वर्षे उलटले, पालकमंत्रीही बदलले, मात्र अद्यापही अहवाल गुलदस्त्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांडाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. कोविड अतिदक्षता विभागास आग लागून तब्बल १४ कोरोनाबाधित रुग्णांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला होता.

या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेला आज ६ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण झाले. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या भयंकर प्रकरणाला आज दोन वर्षे होऊनही या गुन्ह्याचा चौकशी अहवाल राज्य शासनाने अद्याप जाहीरच केला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह ५ आरोपीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात देखील दोषारोपपत्रही पोलिसांना दाखल करता आलेले नाही.

राज्य सरकारच्या आरोग्य संचालकांनी परवानगी न दिल्याने हे रखडले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

* या आठवणींना देऊ उजाळा

कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयात भरपूर रुग्ण दाखल होते. याच दरम्यान अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी आग लागली. यात ११ रुग्णांचा जागेवर तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली. अगदी केंद्रातून अमित शहा यांनी याची दखल घेतली.

परंतु रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य विभाग यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली नाही. शेवटी पोलिसांनीच फिर्याद नोंदवत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा राजेंद्र शिंदे, आरोग्य कर्मचारी सपना उत्तम पठारे, आस्मा रज्जाक शेख व अनंत दत्तात्रय यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

* मुश्रिफांनंतर विखे आले, तरी समितीचा अहवाल गुलदस्त्यात

ही आग लागली. अनेक मृत्यू झाले. त्यानंतर राज्यभर असंतोष निर्माण झाला. त्यामुळे या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली.

या समितीने चौकशी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला. परंतु आज दोन उलटूनही या समितीने काय चौकशी केली, कोणत्या शिफारसी केल्या, आगीच्या घटनेचे कारण काय होते हे अजूनही समोर आले नाही.

त्यावेळी अहमदनगर पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ होते. त्यानंतर भाजप सरकार आले व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पालकमंत्री झाले. या दोघांनीही या समितीचा अहवाल सादर करू असे सांगितले होते. परंतु अद्यापही हा अहवाल गुलदस्त्यातच आहे हे मात्र विशेष.

दरम्यान जळीतकांडप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून आमच्याकडून दोषारोपपत्र तयार आहे. गुन्ह्यातील आरोपी हे सरकारी कर्मचारी असल्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी संबंधित सरकारी विभागाची परवानगी लागते, अद्याप आरोग्य विभागाची परवानगी मिळाली नाही असे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe