जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

Mahesh Waghmare
Published:

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात येते.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर, मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. नागपूर शहर पोलीस उपायुक्त, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक येथे कर्तव्य बजावले. सलग १३ वर्षे सेवा पूर्ण केल्याने त्यांची भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे. सध्या त्यांना आहे त्याच ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे.

याशिवाय मुळच्या नगर जिल्ह्यातील असलेल्या आणि पुणे येथे कार्यरत असलेल्या तेजस्वी सातपुते यांनाही निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe