अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉलव्दारे ऑनलाईन सुनावणी घेऊन अमेरिका व भारतात राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याचा परस्पर संमतीने होत असलेला घटस्फोट नगर येथील न्यायालयाने मंजूर करत, या पद्धतीचा जिल्ह्यातील हा पहिलाच निकाल दिला.
या बाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील तरूण पाथर्डी तालुक्यातील असून तो अमेरिकेतील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरीस आहे.ठाणे येथील उच्चशिक्षित तरुणीशी त्याचा २०१८ साली विवाह झाला होता.
विवाहानंतर दोघेही अमेरिकेत स्थायीक झाले, मात्र काळाच्या ओघात दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी आपसात चर्चा करून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
मात्र त्या पूर्वीच ती तरूणी भारतात आपल्या माहेरी आली होती.या दोघांनाही परस्पर संमतीने घटस्फोट द्यावा असा अर्ज वकीलाव्दारे नगर येथील न्यायालयात दाखल केल.
मात्र लॉकडॉऊन असल्याने त्या तरूणाला सुनावणी दरम्यान उपस्थित राहता न आल्याने खटला लांबला मात्र त्या नंतर न्यायालयाने त्यास जर खरोखर घटस्फोट हवा असल्यास अमेरिकेत त्या आशयाचे प्रतिज्ञापत्र तयार करून ते वकीलामार्फत न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले.
त्या नंतर त्याने अमेरिकेत प्रतिज्ञापत्र तयार करून ते न्यायालयात सादर केल्या नंतर नगर न्यायालयातील १४ वे सहदिवाणी न्यायाधीश पी. एम. उन्हाळे यांनी बडे यांच्या मोबाईल वरून त्या तरूणास व्हिडीओ कॉल केला.
आपण सादर केलेले प्रतिज्ञापत्र खरे असून आपणास घटस्फोट हवा असल्याचे या सुनावणीत सांगितल्या नंतर पी. एम. उन्हाळे यांनी या घटस्फोटास मंजुरी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दिलेला नगर न्यायालयातील हा पहिलाच प्रकार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved